सोमवार, जून २७, २०११

भांडणाचा कार

      
 
            

                   जीवनात बऱ्याच गमती जमती घडतच असतात. आणि त्यात भाषेवरून झालेल्या गमती जमती तर रोजच्याच हो न! आपल्या भाजीवाली आणि गुजराथी बायकांची एक गोष्ट आठवून पहा. आणि आपली मुंबई तर या वाद विवादांनी खच्चून भरलेली असते. लोकलमध्ये बसमध्ये बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतेच न.... अशीच एक एक गम्मत पाहून मला सुद्धा हसू फुटतेच....

                        एकदा असेच माझ्या बँकमध्ये मी काही कामाकरिता गेलो होतो. तिथे एक मराठी बोलणारी बाई आली होती. तशी ती शांत वाटली. आणि लुक म्हणजे अगदी टिपिकल मराठीबाई सारखा साधाच, मी टोकन घेऊन नंबर येईपर्यंत समोर सोफ्यावर बसलेलो.समोरून आलेल्या त्या बाई पासबुक खिडकी वर पासबुक एन्ट्री करण्यासाठी गेल्या. खिडकीत बसलेल्या एका मद्रासी बाई ने पासबुक हातात घेतले. आणि प्रिंटींग मशीन मध्ये टाकले, आणि पटकन त्या मराठी बाईला म्हणाली, "आप का कितना दिन से एन्ट्री बाक्की, अय्यो" अस बोलून ती मागच्या बसलेल्या हेड एकाउन्टट साहेबांना काहीतरी पुटपुटली. आणि पुढे होऊन पुन्हा मराठी बाईला म्हणाली, "अब टाइम लगेगा, आप जाके उदर सोफे पर बैटो! वक्के. जस्ट वेट", "व्हॉट अ वूमन, बोलून तोंडातल्या तोंडात तिच्या भाषेत काहीतरी पुटपुटली." त्यावर ती मराठी बाई पटकन आपल्या अस्सल मराठी मध्ये बोलली, "क्काय? कसला टाइम लगेगा. लवकर एन्ट्री करके दो!" समोरच्या मद्रासी बाईच्या तोंडावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दुसरयाच क्षणाला मराठी बाई बोलली,"तुला क्काय प्रोब्लेम हाय ग! गप एन्ट्री कर कि" सगळी लोक अव्वाक झाली आणि तिच्या तोंडाकडे पाहू लागली. तिच्या डोक्यावर आठ्या पडल्या होत्या. घाबरून समोरच्या मद्रास्णीने व्यवस्थापकांना बोलाविले. पण तो पर्यंत मराठी बाईने जणू काही साफ सफाई करायचाच ठरवले होते. एक माणूस त्यांना जाऊन म्हणाला,"काय झालं बाई कशाला चिडता?" त्यावर "न्हाईतर काय, हिला अक्कल हाय का काडीची हिला काय करायचय मी एन्ट्री रोज रोज करीन न्हाईतर महिन्यातून करीन न्हाईतर वर्षातून करीन. हि कोण मल्ला सांगणारी?" असं सटासट उत्तर दिल. कुणाला काही समजेना ती कशावरून इतकी भडकली? का भडकली? सगळी कडे लोक काम थांबवून तिच्या कडे पाहत होते. व्यवस्थापक आले आणि उद्रेकच झाला. "इस बाई को कूच नही कळता है तर कशाल्ला रक्का हिला कामपर, हि मेरकु बोलते" असा काहीस उलटच झालं. व्यवस्थापक सरळ समोरच्या मद्रासणीला माफी मागायला लावली. आणि पासबुक द्यायला लावल. मद्रासणीला रडू कि काय करू असे झाले होते. ती गप्प बसून आपले काम करू लागली. तोपर्यंत माझा टोकन सुद्धा आला होता. मी आपले काम उरकले आणि सरळ बाहेर पडायला निघालो. तर मराठी बाई माझ्या बाजूनेच निघाल्या. त्या थांबून थोडस हसल्या. मग मी पटकन विचारून घेतलचं, "तुम्ही मघाशी इतक्या का भडकल्या त्या मद्रास्णीवर." तर त्या इतक्या स्वच्छ मराठीत बोलल्या कि, " कि ते मी तिला धडा शिकवत होते, मला कन्नड सुद्धा येते. आणि ती मला त्या भाषेत "काय बाई आहे हि! अजून महिन्याभराने यायचं न!" असं म्हणाली म्हणून मी जरा तिला घाबरविण्याकरिता असं बोलत सुटले." असं बोलून त्या मात्र निघून गेल्या. महाराष्ट्राचा अभिमान असल्यागत म्हणजे जो असायलाच हवा असा ती बाई तरा तरा पुढे निघून गेली. पण ती आत खेडी बायकांसारखी का बोलत होती? ते विचारायचं राहिलेच विचार कसा आणि कुठे करावा हे गणितच चुकले. असे बरेच विनोद तुमच्या हि आस-पास सुद्धा घडलेच असणार. 

अजून एक गोष्ट हसणे आरोग्यासाठी चांगलेच असते.

1 टिप्पणी: