मंगळवार, जुलै १९, २०११

विकली मुंबई!!!

मानेवरच्या तलवारीची धार का बोथटली 

त्या रक्तरंजित दिवसांची आठवण तयांच्या मनी खुंटली,

वाघ गेला लांडगा आला कारभार राज्यास तयांचा कधी न उमगला,

  थेंब थेंब रक्त सांडते तरी भ्रष्ट कारभार नाही सुटला,

श्वास तुटला, विश्वास मुकला, बधीर होऊनी किंकाळ्या मात्र ऐकल्या,

येवून थाटती बाजार लाज का मनी नाही उरली,

सोन्याची या माती केली, दगडांवरती पदे कोरली,

पितळ पांढरी मने ज्यांची जाहली. कृतघ्नतेची परिसीमा गाठली,

मरताची रोजची मुंगीपरी माणसे म्हणुनी वाच्यता कशी करुनी सोडली,

पैशांच्या बाजारी विकुनी माय आपुली दान धर्माच्या नावाखाली त्याची दिसे काळी सावली,

मरणाच्या सद्जनाच्या पैशांची देतात जांभई,

श्वानधर्म जणू अंगी त्यांनी खाल्ली विकुनी मुंबई, खाल्ली विकुनी मुंबई.....










४ टिप्पण्या: