सोमवार, डिसेंबर २६, २०११

स्मरणीय भेट!!!

नयनी अश्रूंनी घर केले!! कारण फक्त मैत्रीचा खेळ!!
बझ्झ भेटीची येता आठवण!! परी निभवला वेळ!!



              आठवतो का तो एक दिवस उनाडकीचा..., खर तर आठवणी कधीही निघून जात नाही. किंवा पुसून जात नाहीत. रक्तात वसलेल्या असतात त्या कश्या निघणार?

            मैत्रीचे विश्व म्हणजे वेड्यांचे जग!! अशीच झालेली ती पहिली भेट पुन्हा खुणावत होती. आपल्या सर्व बझ्झकरांना, गेले महिना भर तसाच हो, नाही, नक्की, पक्का, माहित नाही चा तो सूर, भेटण्यास पुन: आतुर झालेले ते मन, आणि रक्तात वसलेल्या त्या घट्ट आठवणी उसळून आल्या आणि पुन्हा बझ्झ भेट पुणे यथे  करायची ठरले. गणरायाची कृपा सदैव राहिलीच आहे सर्वांवर! आणि झालेही तसेच, पुण्याला मुंबईच्या आम्हा पाच जणांची ठाणे - पुणे - ठाणे स्वारी निघाली, त्यात घडलेल्या असंख्य पराक्रमांनी तर प्रवास गाजवला. तो सांगायला विसरणार कसे?

              बझ्झ मित्र मंडळ आणि त्याचे हे सर्व मित्रगण पुन्हा एकमेकांच्या भेटीला उत्सुक होऊन सज्ज झाले. पुण्यात पुणेकरांनी सकाळपासूनच तयारी लावली होती आणि क्रिसमसच्या शुभ मुहूर्तावर भेट झालीच. मुंबई ठाण्याचे ४ महारथी आणि १ रणरागिणी सकाळ सकाळ सिंहगडाच्या गाडीत आरक्षित बोगीत (जनरलचे तिकीट काढूनहि) स्वर झाले. आणि पुणे वारीस निघाले. अधांतरी अवस्था कशी असावी हे तेव्हाच समजले. आपण आपल्या मित्रांना भेटणार पुन्हा! ते सुद्धा इतक्या कालावधीने! यानेच जीव सोकावला होताच.. अगदी मागच्यावेळी जसे भेटायला आतुर कि उतावीळ झालेले ते कासावीस मन पुन्हा नजरेस पडले. अवघ्या १२ - १३ जणांसोबत मित्रांची हि भेट सुद्धा पूर्ण केली. वास्तविक पाहता मागील वेळीस ठरवलेल्या २० - ३० जणांपैकी जसे १२ - १५ लोक जमले तसेच या वेळी देखील झाले. पुणेकरांनी एक एक करून स्वागत केले. मुंबईला रस्ता दाखविणे कठीण मग पुणे स्थानकात पाय टेकवल्या टेकवल्या कुणी घ्यायला आले आहे का? अशी भिरभिरती शाळेच्या लहान मुलाची नजरच फिरत होती. पण इथे थोड स्वतःच ओझ पुण्यात स्वतःनेच ओढावे ची जाणीव झाली आणि आम्ही पुढच्या रस्त्यास लागलो रस्ता विचारत विचारत (मुख्य:त प्रत्येकाने "कसे जावे?" चे उत्तर सरळ दिले) चालत स्वारगेट गाठायचे ठरले. पण थोडा रस्ता पुढे गेल्यावर उमगू लागले कि चालत जाणे हा यावर उपाय नाही (मुंबईची सवय शेवटी धावत जग) म्हणून सरळ समोरच्या बसमध्ये आम्ही चढलो. काही माहित नाही कि हि बस कुठे जाते? नी कुठे नाही? अगदी मुंबईत पहिल्यांदा आलेला भैय्या आठवला मला तर! पण हळू हळू "पी एम टी" ने आम्हाला स्वारगेट दाखवले. रस्त्यात किती गोष्टी आम्ही मिस केल्या देव जाणे! शेवटी लाले लाल स्वारगेट समोरच होता. पुढचा प्रवास करायच्या आधी आमचे परम मित्रांत शर्यत लागली होती जणू एक बाजूने अलोक आणि एक बाजूने वैशाली कुणीतरी पंधरा मिनिटात येयील या आशेने आम्ही लाल लाल बस आडून पाहत होतो. सशक्त पहारा लावल्या सारख्या सर्व यष्टीच्या बसेस समोर उभ्या पण त्यातल्या त्यात पिवळ्या पिवळ्या रंगाच्या रथातला आमचा पाहीला कृष्ण दिसला.
               पहिला कृष्ण अलोक आला आणि आम्हाला पुण्यात पहिला आनंद झाला. त्याने आमचे स्वागत केले तेही काहीही माहित नसताना कारण त्याने महिनाआधी पासून चालेली भेटीची पोस्ट आणि मेल पाहिलेच नव्हते. फक्त माझ्या सकाळच्या फोन वरून तो तयार होऊन पळत पळत आपली बाइक घेऊन आला. आणि आमच्या स्वागताला लागला. पुण्याच्या प्रसिद्ध हॉटेलात आम्ही न्याहारी उरकली तिथेच आम्ह्चे स्वागत पूर्ण करायला एक मराठी तारका उगवली आणि ते हॉटेल पंचताराकिंत भासू लागले. त्या तारकेने आम्हाला पुढचा सारस बागेचा रस्ता दाखवायला सुरुवात केली तसे आम्ही सर्व त्या दिशेला निघालो. कृष्ण तरी रथ घेवून पळाला. बागेत पोहचून आम्ही जगस्वामी गणरायाच्या दर्शनाला गेलो सिद्धिविनायकाचे दर्शन आणि समोर आमच्या मित्रांचा घोळका पाहून आमचा जीव सुखांतिक झाला आणि प्रवासातला सर्व थकवा निघून गेला. तिथे सर्वांचा परिचय तसेच जुळलेल्या नवीन नात्यांची ओळख झाली आणि बझ्झवर आमच्या मंडळाला झालेले फायदे सुद्धा कळले.

                                         रंजक सोहळा भासला, मज ऐसा मैत्रगण मिळाला !!!
                                         स्वामि निष्ठेस राही मन तैसा भेटीचा सोहळा जाहला !!!

तृप्त झालेल्या मनाला विश्रांती दिली. आणि सगळ्यांचा पुढचा प्रवास चालू झाला. त्यात पुण्याच्या आमच्या मित्र मैत्रिणीनी खूप मोलाचा सहभाग दिला. त्यात एक नवा आणि मानाचा चेहरा होता तो म्हणजे श्री. राज जैन आणि श्री. चैतन्य जोगदेव यांचा त्यांनी आम्हा सर्वांना खडकवासलाच्या निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद लुटण्यास नेले त्यात महत्वाची भेट ठरली ती होती आमच्या धावत्या निखीलची!!!!!!!!!!!!!! खूप प्रसन्न असे त्याचे स्वगतातिथ्य अप्रतिम होते. नाम मात्र नसलेली हि मैत्री किती महत्वाची आहे ते चैतन्य आणि विनिताच्या त्यांच्या स्वतःच्या कामाला सोडून काढण्यात आलेल्या वेळेचे महत्व जाणून समजले. निवेदिता पाटील - जैन आणि राज जैन यांनी सुद्धा आपल्या महत्वाच्या वेळेचा भाग सुद्धा या भेटीला दिला, धावत पळत आलेले निखील, अलोक आणि वैशाली यांनी आम्हाला अगणित आनंद दिलाय, भेटीत शांतता बाळगलेल्या भरतचे कौतुक करावे तेव्हडे कमी एरव्ही फेसबुक, गुगल+, बझ्झ आपल्या सगुणरुपी जोक्स आणि पोस्टने खिदळवून सोडणाऱ्या या भरतने मागच्या वेळी शांतीस्वरूप वैशालीची आठवण करून दिली हे नक्कीच! निलेश कुलकर्णीचा तोल जबरदस्तीने आठवावा असा आठवला! खडकवासल्याच्या छोट्या दगडांनी सुद्धा त्याला हुलकावणी दिली होती. 

                    पुणे भेट मध्यावर पोहोचली आणि खडकवासल्याच्या तलावाशेजारी मस्त भजी,वडे, शेव-पुरी, चाट, यांचा मनसोक्त आनंद घेवून आणि तलावाची मनमोकळी हवा खावून सुप्रसिद्ध टमटम गाड्या पुन्हा सज्ज झाल्या आमच्या पुढच्या प्रवासाला साथ द्यायला. आम्ही टमटमने डोणगे फाट्यावर उतरलो समोरच्या हॉटेल मध्ये चहाचा आस्वाद घेवून आम्ही सिंहगड सर करायचा कि नाही याची वाट पाहू लागलो, सिंहगड सर करावा कि नाही याची जवाबदारी शेवटी राजेंवर येवून ठेपली, वेळेच्या बंधनाने सिंहगड रद्द केला आणि पुन्हा टमटममध्ये बसून पुण्याच्या सारसबागेचा रस्ता धरला. सर्वजण हळू हळू येऊन तिथे पोहोचले. आमची मंडळी बागेत जाऊन बसली स्नेहा आणि अतुल फोटोशूटच्या निम्मित्ताने त्यांच्या सोबतच गेले, पण जरा अजून थोडी रंगत चढविण्याकरिता मी आणि गणेशने थोडा वेगळा कार्यक्रम आखला. निवेदिता आणि राजे तसेच विनीत आणि चैतन्य साठी आणि क्रिसमसचे औचित्य साधून दोन केक आणले. ते आणण्यातही आमच कसब पाहणे नाही सोडले पुण्याने, तरीही आमच्या मित्रांच्या खुशिमे आम्ही अजून चार चांद लावले. केक कापून आणि त्याचा आस्वाद घेवून फोटो शूट जोरात रंगले, आम्ही दोघे नसतांना बाकीच्या मोठ्यांनी लहान मुलांसारखे वागून चेंडू सोबत मस्त खेळ रंगविला होता. खूप खूप मज्जा केली त्यांनी सुद्धा, केक साफ झाल्यावर
निघण्याच्या तयारीत असलेले मुंबईकर (अगदी धावपळ)  धावत्या भेटीच्या तयारीला लागले.  २५-१२-२०११ ची हि भेट सुद्धा अतिशय मस्तच  झाली. अत्यंत महत्वाचा क्षण आणि त्यात आणखीन एका पुणेकराची भेट अगदी वेळेच्या काठावर जावून झाली. आणि ती भेट होती स्वानंद मारुलकरची....
                   
                 स्वानंदच्या परम भेटीच्या आणि छोट्याश्या ओळख समारंभात १५ - २० मिनिट बुडाल्यावर मात्र निघण्याची तयारी वाढली. आणि मुंबईकरांनी पुणे स्टेशनची वाट धरली. तिकीट काढून पुढच्या प्रवासाची तयारी करून सिंहगड एक्स्प्रेस ने आम्ही पुणे सोडले आणि प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे ते गोड प्रसंग मनाशी धरून आम्ही मुंबईकर आमच्या घरी परतलो.

                 या सर्वच गोष्टीत आमचा पुणे प्रवास खूप मजेदार होता. तो  पण जरा वाचून पहा... (ठाणे-पुणे-ठाणे)



महत्वाचे : मध्यंतरी कामात अडकल्यामुळे पोस्ट  टाकण्याचे राहून गेले म्हणून आज तुमच्या समोर मी सदर करीत आहे. तरी मागच्या वर्षीच्या भेटीची कथा तुम्हाला एकविणे महत्वाचेच न म्हणून तरी उशीर केल्या बद्दल क्षमस्व.

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा